श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ऑक्सिजन प्रकल्प

अकलूज (बारामती झटका)
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा कै. सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या तत्वावर यशस्वीपणे घौडदौड करीत असून सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी राहिला आहे, यापूर्वी दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा छावणी उभारणी करणे असेल, दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी पुरवठा करणे असेल, अतिवृष्टीने बाधित झालेल्या गावांना अन्नधान्य पुरवठा करणे असेल, गरजुंना विविध प्रकारे मदत करणे असेल तसेच ”शेतकरी हिताय, कामगार सुखाय” या मोठया मालकांच्या शिकवणी नुसार सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला जातो.
कोरोनाच्या या महामारीमध्ये ऑक्सीजन अभावी असंख्य लोकांना प्राण गमवावे लागत आहेत ही बाब कारखान्याचे चेअरमन आमदार श्री.प्रशांतराव परिचारक तसेच व्यवस्थापनाच्या निदर्शनास आल्यानंतर सर्वप्रथम या प्लॅंटची उभारणी करण्याची तयारी दर्शवून चांगल्या प्रकारचा दिर्घकाळ चालणारा इम्पोर्टेड प्लँंट बसविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार साई नॉन कन्वेर्शियल एजन्सी, नाशिक यांच्यामार्फत तैवान या देशातून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आयात करण्याचे धोरण ठरविण्यात आले. प्रकल्प लवकरात लवकर उभारणीकरिता आटोकाट प्रयत्न करुन जहाजा ऐवजी विमानातून हा प्रकल्प कारखाना कार्यस्थळी आणण्यात आला तद्नंतर सदर प्रकल्पास अनुषंगिक असणारी सर्व कामे व्यवस्थापनाने अगोदरच परिपूर्ण तयार करुन ठेवल्याने सुमारे आठ तासात या प्रकल्पाची कारखाना कार्यस्थळी उभारणी करणे व्यवस्थापनास शक्य झाले.
हा प्रकल्प महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीमधील स्किड माऊंटींग पध्दतीचा प्रेशर स्विंग ऍडसॉर्ब्शन हवेतून ऑक्सीजन निर्माण करणारा पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे.सर्वसाधारण हवेमध्ये 78% नायट्रोजन, 21% ऑक्सीजन व 1% इतर वायू असतात अशीही नैसर्गिक हवा या प्रकल्पांमध्ये खेचून घेतली जाते व पी.एस.ए. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या हवेमधून नायट्रोजन व इतर वायू, आद्रता धुलिकण इत्यादी अनावश्यक बाबी वेगळया केल्या जातात यामध्ये मुख्यत्वे करुन कॉम्प्रेसर प्युरिफायर, बूस्टर पंप, प्रोग्राम लॉजिक कंट्रोल सिस्टीम, फिलिंग स्टेशन इत्यादी मशिनरी येत असते. या प्रकल्पातून वेगळा करण्यात आलेला ऑक्सीजन 93 % ते 96 % इतकी शुध्दता असणारा निर्माण होतो हा ऑक्सीजन एका स्टील टँक मध्ये साठविला जात असून तो नंतर बुस्टर पंपाद्वारे ऑक्सीजन सिलेंडरमध्ये भरला जातो कारखान्याकडील हा प्रकल्प विदेशी असल्यामुळे पूर्णपणे स्वयंचलित आहे या प्रकल्पाची क्षमता 25 क्युबिक मीटर प्रति तास म्हणजेच प्रतिदिन सुमारे 100 जम्बो सिलेंडर भरणे इतका ऑक्सीजन तयार करणारा आहेत.
या ऑक्सीजन प्लॅन्टची ट्रायल पूर्ण झाली असून उत्पादित करणेत आलेला ऑक्सीजन ज्युबीलंट फार्मा ऍ़न्ड केमीकल कं मुंबई यांच्याकडून प्रथ:करण करुन घेणेत आला असून निर्माण झालेला ऑक्सीजन मेडिकल उपयोगासाठी योग्य असलेला दाखलाही प्राप्त झाला आहे. आज दि.4/6/2021 रोजी कारखान्याचे चेअरमन आ.श्री.प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते तसेच कारखान्याचे मोजके संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कोरोना संबंधीचे सर्व नियम व अटी काटेकोरपणे पाळुन उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे.
ऑक्सीजन प्लॅन्टमधून उत्पादित होणारा सर्व ऑक्सीजन आवश्यक त्या मेडिकल उपयोगाकरिता देण्यात येणार आहे. हा प्रकल्प स्वतंत्र स्वरुपाचा असल्यामुळे त्यासाठी कारखान्याकडील सध्या चालू असलेला कोणताही प्रकल्प बंद ठेवावा लागणार नाही, त्यामुळे या प्रकल्पाचे स्वतंत्रपूर्ण व सातत्यपूर्ण उत्पादन सुरु राहील, प्रकल्प उभा करताना व्यवस्थापनाने अभ्यासपूर्ण निर्णय घेतल्यामुळे जास्तीची अर्थीक तोषीस न लागता या प्रकल्पाचे सुअर्थीक नियोजन करुन उभारणी केली आहे.
कारखान्याचे सभासद, शेतकरी व हितचिंतक यांना कोरोना पार्श्वभूमीमुळे या समारंभास उपस्थित राहता येणार नसलेमुळे यु-टयुब द्वारे सदरचा कार्यक्रम पहाता यावा यासाठी यु-टयुब लिंक देवून तशी यवस्था करण्यात आली होती.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री वसंतराव देशमुख, संचालक श्री.दिनकरभाऊ मोरे, श्री हरिषदादा गायकवाड, श्री.शिवाजीराव साळुंखे, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.सुरेश आगावणे, श्री.बाळासोा यलमार, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.महीबुब शेख, श्री.नामदेव झांबरे, श्री.दिनकरराव कवडे, श्री.आनंदराव आरकिले, श्री.परमेश्वर गणगे, श्री.नागन्नाथ शिंदे, श्री.भिमराव फाटे, श्री.अरुण घोलप आदि उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here