श्री शंकर साखर कारखान्याच्या उमेदवारीचा घोळ उच्च न्यायालयात.

सदाशिवनगर (बारामती झटका )

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर ता माळशिरस या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक साठी उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज भरलेले होते छाननी दिवशी हरकतीचा पाऊस पडलेला होता अनेक नामवंत वकिलांनी येऊन बाजु मांडलेली होती परंतु काही उमेदवार यांनी दिशाभुल करणारी कागदपत्रे सादर करुन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांचे कडुन उमेदवार अर्ज वैध करुन घेतल्याने नऊ उमेदवार यांच्या उमेदवारीचा घोळ उच्च न्यायालय मुंबई येथे 12/11 2018 रोजी 32591/32593/32594/32595/2018 या क्रमांकाने चार पिटीशन दाखल झालेली आहेत कारखान्याच्या निवडणूकीत उमेदवार अर्ज भरीत असताना व छाननी वेळेस सादर केलेली कागदपत्रे दिशाभुल करणारे उमेदवार फोंडशिरस गटामधुन 1) पंकज भिमराव वाघमोडे रा. मारकडवाडी 2) दत्तु बाबा वाघमोडे रा.फोंडशिरस 3) संजय दत्ताञय कोरटकर रा. गुससाळे 4) चंद्रकांत नारायण शिंदे रा.शिंदेवाडी बोरगाव गट 1)दत्ताञय नारायण चव्हाण रा.वाफेगाव 2) बबन नारायण साळुंखे रा.वाघोली 3) भगवान गणपत मिसाळ रा.वाघोली इस्लामपुर गट 1)अमित विलास माने रा.म्हसवड जि.सातारा इतर मागास वर्गीय जातीचे प्रतिनिधी 1) शिवाजी रामहारी गोरे रा.फोंडशिरस आशा उमेदवार यांच्या वर उत्तम सोपान बाबर जनार्धन शिंदे सुदर्शन माणिकराव मिसाळ संजय साधु दबडे यांनी उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केलेले आहे सदर उमेदवार यांनी शेअर्सच्या प्रमाणात ऊस पुरवठा केलेला नाही अशी नामनिर्देश पञावर हरकती घेतलेल्या होत्या त्यापैकी शिवाजी रामहारी गोरे रा.फोडशिरस यांना पहिला दाखला जा.क्र .शेती -शेअर्स 622/2018-19दिनांक 27/10/2018 रोजी दिलेल्या दाखल्यात उस पुरवठा केलेला आहे असा दिला तर जा.क्र .शेती – अकौंट /739 / 2018/19 दि.03/11/2018 रोजी नाही नाही असा दाखला दिलेला आहे आशा दिशाभुल दाखल्यामुळे हरकतीचे गौडबंगाल वाढले बारामती झटक्याने चार ते पाच सदस्य बिनविरोध होणार भाकित सांगीतले होते छाननी नंतर दाल मे कुछ काला है हेही सांगितले होते त्याप्रमाणे निघत आहे खरी वस्तुस्थिती लवकरच बाहेर काढणार आहे अर्ज कसे वैद्य झाले माहिती संकलित करण्याचे काम चालू आहे लवकरच वाचकांना माहिती देऊ उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 14/11/2018 रोजी पर्यंत आहे दरम्यान न्यायालयात उमेदवारी वर टांगती तलवार आल्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटिल गटातील उमेदवार असल्याने खळबळ माजली आहे न्यायालयाने सर्व कागदपत्रे तपासून दाखल करुन घेतले असल्याने नऊ सदस्य जरी उमेदवार राहिले आणी निवडून आले तर त्यांचे संचालक पद औट घटकेचे ठरु शकते न्यायालय किंवा साखर आयुक्त अपाञ ठरवु शकतात कारण शंकर कारखान्याचे प्रशासक. प्रभारी कार्यकारी संचालक व मुख्य शेतकी अधिकारी यांनी नऊ जणांनी शेअर्सच्या प्रमाणात ऊस पुरवठा केलेला नसताना जाणीवपूर्वक दिशाभुल करणारा दाखला दिला आणी त्याच अधिकारी यांनी उस पुरवठा केलेला नाही म्हणून दाखला दिला कारखान्याचे प्रशासक व अधिकारी यांनी चुकीच्या दिलेल्या दाखल्यामुळे आम्हाला न्यायालयात जावे लागले चुकीचा दाखला कोणाच्या दबावाने का? आर्थिक देवाणघेवाण मधुन हा संशोधनाचा भाग आहे उमेदवारी अर्ज बाद झालेले उमेदवार यांचे स्पष्ट म्हणतात नऊ सदस्य हे रणजितसिंह मोहिते पाटिल गटाचे आहेत आज पर्यंत निवडणूक मध्ये सर्व कागदपत्रे शिवरत्न वर जमा करुन अर्ज व कागदपत्रे तपासणीसाठी खास वकील लोकांची टिम असते मग हे दिशाभुल करणारे दाखले माहिती असायलाच पाहिजे देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम केलेल्यांन कडुन हे अपेक्षित नव्हते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली सरळसरळ लढत होऊन सभासदांना योग्य वाटणाऱ्या उमेदवार यांना निवडून दिले असते हे झाले नऊ उमेदवार यांचे अजुन रणजितसिंह मोहिते पाटिल बाबाराजे देशमुख सुरेश मोहिते यांच्या उमेदवारी विरोधात न्यायालयात कायदेशीर बाबींवर लढाई चालू असुन लवकरच त्याच्याही विरोधात उच्च न्यायालयात दाखल होणार आहे दोन दिवस उमेदवार अर्ज माघार घेण्याची मुदत आहे नंतरच निवडणूक चित्र स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here