सवेंदनशिलता काय असते ती आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडून शिकावी

माळशिरस (बारामती झटका)

काल इंदापुर तालुक्यातील कब्बडी खेळाडू स्पर्धेसाठी हुबळी (कर्नाटक) या ठिकाणी चालले असताना त्यांचा विजयपुर जिल्ह्यातील कोल्लरा तालुक्यात अचानक अपघात झाला. यावेळी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले.

अपघात झाल्याचे समजताच संबंधित अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी आ. सातपुते साहेबांनी पण लगेच तत्परता दाखवत विजयपुर जिल्ह्याचे भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष बसवराज हुगार यांच्याशी तत्काळ संपर्क साधत त्यांना तत्काळ घटनास्थळी जाऊन मदत करण्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष बसवराज हुगार यांनीही क्षणाचाही विलंब न करता त्याठिकाणी पोहचुन खेळाडूंना शिफ्ट करुन हॉस्पिटलमध्ये भरती केले. ते तिथे पोहोचल्यामुळे प्रशासन तात्काळ कामाला लागले.

आमदार साहेब पण वेळोवेळी कॉल करुन परिस्थीचा आढावा घेत होते. प्रशासनास सुचना करत होते. नेहमी कार्यतत्पर असणारे आमदार म्हणून राम सातपुते परिचित आहेतच पण त्यांच्या कार्यतत्परतेचा व सवेंदनशीलतेचा आज पुन्हा प्रत्यय आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here