सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात संपन्न

अकलूज (बारामती झटका)

सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च, शंकरनगर, अकलूज, ता. माळशिरस या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. ०८/०३/२०२१ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून स्वरूपाराणी माहिते – पाटील उर्फ दिदिसाहेब लाभल्या. तसेच प्रमुख पाहूण्या म्हणून ब्रम्हकुमारी राजयोगीनी सोमप्रभा बहनजी लाभल्या. त्याचबारोबर ब्रम्हकुमारी शिवरात्री बहनजी तसेच सोलापूर जिल्हयातील विविध ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयांच्या सेवाकेंद्रावरील संचालिका त्याचबरोबर महिला तक्रार निवारण समिती सदस्या डॉ. श्रद्धा जवंजाळ या सर्व उपस्थित असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजीत यादव यांनी दिली.

यावेळी बोलताना स्वरुपाराणी मोहिते पाटील उर्फ दिदिसाहेबांनी त्यांच्या अध्यक्षिय भाषणामध्ये सांगितले कि, जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडेच महिलांच्या समस्या आहेत. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच सर्वांनी शिक्षणाबरोबर मानसीक आरोग्य जपणे देखील आवश्यक असल्याचे सांगीतले.

तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या ब्रम्हकुमारी राजयोगीनी सोमप्रभा बहनजी यांनी त्याच्या आर्शिवचनामध्ये महिला सशक्तीकरण होणे गरजेचे आहे व त्यासाठी पुरुषांनी सहयोगी बनून महिलांची साथ दिली पाहिजे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बोलत असताना त्यांनी सांगीतले की, जसे शारीरीक प्रतीकारशक्ती गरजेची आहे तसेच आत्मीक प्रतीकारशक्तीदेखील वाढविणे गरजेचे आहे.

हा कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील साहेब, सचिव राजेंद्र चौगुले साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित यादव यांनी धाडसी वृत्ती व उर्जा या गोष्टी जीवनाला दिशा देतात. त्यामुळे त्या गोष्टी महिलांनी अंगीकाराव्यात असे सांगीतले. तसेच महाविद्यालयामध्ये दरवर्षी महिला दिन उत्साहात साजरा करण्याचे आश्वासन देवून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सागर फुले, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. आरती भातलवंडे व कु. आरती सुरवसे या विद्यार्थीनींनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here