स्वाभिमानीच्यावतीने स्व. महमुद पटेल यांच्या प्रतिमेस भावपूर्ण आदरांजली

सोलापूर (बारामती झटका)
गुरुवार दि. १० रोजी सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा कार्यालयामध्ये स्वर्गीय महमुद पटेल यांच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील, सचिव उमाशंकर पाटील, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विजयकुमार साठे यांची उपस्थित होती.
सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय महमुद पटेल यांच्या दुःखद निधनामुळे सोलापूर जिल्ह्याची फार मोठी हानी झाली आहे. स्व. पटेल यांचे सोलापूर जिल्ह्यामधून शेतकऱ्यांसाठी तळमळ असणारे व सडेतोड विचार असणारे आणि लोकप्रिय व सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आपण गमावला असे याप्रसंगी बोलताना युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले.


यावेळी सचिव उमा शंकर पाटील, प्रवक्ते इक्बाल मुजावर, ज्येष्ठ नेते पोपट साठे, दिनेश शिंदे, सलाम शेख, डॉ. वसंत गायकवाड, चांदसो यादगिरी, दत्तात्रय पांढरे, हमीद वस्ताद यांच्यासह महमूद पटेल यांचे चिरंजीव इरशाद पटेल आणि मोहसिन पटेल आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here