स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पंढरपूर येथील तहसीलदार साहेबांना निवेदन


पंढरपूर (बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष तानाजीकाका बागल, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे पाटील, राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी पंढरपूर येथील तहसीलदार साहेब यांना शेतीपंपाची लाईट बंद केल्यामुळे पाण्याअभावी करपलेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठीचे निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महावितरणकडून गेल्या एक महिन्यापासून शेती पंपाचा लपंडाव सुरू केला आहे. लाईट बंद केल्यामुळे शेतातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. पाणी उपलब्ध असूनही केवळ लाईट अभावी पिके करपत आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसापासून पंढरपूर, मंगळवेढासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काढणीला आलेली द्राक्ष, डाळिंब, गहू आणि ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. तरी या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे हे निवेदन आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here