स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या वतीने पत्रकारांना धान्याचे वाटप.


सांगोला (बारामती झटका)

संपूर्ण देशामध्ये कोरोनाव्हायरस मुळे संपूर्ण देशामध्ये 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये कोरोना आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनातील विविध विभागाचे शासकीय अधिकारी ,स्वच्छता कर्मचारी ,ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलिस पाटील, मुख्याधिकारी ,पोलीस निरीक्षक ,तालुक्याचे तहसीलदार ,गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पुरवठा विभागाचे अधिकारी यासह प्रशासनातील सर्वच प्रशासकीय अधिकारी हे सामान्य नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी व कोणालाही हा आजार होऊ नये म्हणून शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.

त्यामध्ये शासनाच्या योजना अधिकाऱ्याकडून सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम हे पत्रकारांचे आहे.अशा कठिण परिस्थितीमध्ये सुद्धा सांगोला तालुक्यातील पत्रकार सामाजिक बांधिलकी म्हणून प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी व शासनाच्या योजना लोक पर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून अधिकाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांचे मार्गदर्शन घेऊन काम करीत आहेत . अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांना या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे विमासुरक्षा व शासनाकडून कोणत्याही प्रकारचे मानधन नाही तरीसुद्धा पत्रकार सामान्य नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून वृत्तांकन करण्याचे काम करीत आहेत. याचीच दखल घेऊन स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर यांनी पत्रकारांना आपल्याकडून काही तरी मदत व्हावी, म्हणून त्यांच्या संघटनेच्या वतीने पत्रकारांना धान्याचे वाटप करण्यात आले.

स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर म्हणाले की तालुक्यांमध्ये घडणाऱ्या घडामोडी व तालुक्यातील सद्यपरिस्थिती व शासनाच्या योजना ह्या सामान्य नागरिकापर्यंत पोचवण्याचं काम हे पत्रकार करीत आहेत. आणि लॉक डाऊन च्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची शासनाकडून मदत व इतर सुविधा किंवा विमासुरक्षा कवच नसतानाही अधिकाऱ्या बरोबर सामाजिक काम करण्याचे काम हे पत्रकार करीत आहेत.

ते सामान्य नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून काम करत असताना समाजामधील एक सामान्य व्यक्ती म्हणून मीही पत्रकारांसाठी काहीतरी देणे लागतो व माझी काहीतरी सामाजिक भूमिका लक्षात घेऊन मी या पत्रकारांना छोटीशी मदत करीत आहे. यापुढे सांगोला तालुक्यातील विविध संस्था सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा कठिण परिस्थितीमध्ये गरजू नागरिकांना तसेच समाजासाठी निस्वार्थीपणे झटणाऱ्या पत्रकारांना देखील मदत करण्याचे आव्हान मी करीत आहे अशा पद्धतीची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी सांगोला तालुक्याचे तहसीलदार योगेश खरमाटे ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष राऊत, सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे सचिव राजाभाऊ गुळीग तसेचसंघटनेचे मार्गदर्शक अध्यक्ष हेगडे बुवा, संघटनेचे मार्गदर्शक शहाजी हातेकर, सचिव परमेश्वर केंगार, सचिन गोरवे ,वसंत रूपनर,श्रीनिवास करे अध्यक्ष नवनिर्माण संघटना महाराष्ट्र राज्य चेअरमन सरपंचपोपट गडदे गोडवाडी व पत्रकार उपस्थित होते. स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या वतीने पत्रकारांसाठी अन्नधान्य वाटप केल्यामुळे सांगोला तालुक्यासह सर्वच भागातून संघटनेचे कौतुक केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here