पै.आबासाहेब वाघमारे पाटील मित्र परिवाराच्या वतीने आरोग्य तपासणी व कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधांचे वाटप संपन्न


कोंडबावी (बारामती झटका)


कोंडबावी तालुका माळशिरस येथे दि. 2 जून 2020 रोजी पै.आबासाहेब वाघमारे पाटील मित्र परिवाराच्या वतीने “मदत नव्हे… कर्तव्य” या भावनेतून कोंडबावी परिसरातील ८५० लोकांची आरोग्य तपासणी तसेच ४५०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक आयुष मंत्रालय भारत सरकारने निर्देशित केलेले होमिपॅथिक आर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे मोफत वाटप माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथिचे मा. उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड,पै आबासाहेब वाघमारे-पाटील,भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष डॉ.अक्षय वाईकर, डॉ विजय निलटे,डॉ.बबन ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रास्ताविकात सामाजिक कार्यकर्ते चिरंजीव वाघमारे यांनी पै.आबासाहेब वाघमारे पाटील मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत ‘मदत नव्हे… कर्तव्य’ या भावनेतून कोरोना या आजारापासुन वाचन्यासाठी जनतेला दिलासा म्हणून कोंडबावी या गावातील सर्व नागरिकांची थर्मल स्कॅन द्वारे तपासणी,रक्तदाब तपासणी करून मोफत होमिओपॅथिक औषधांचे वाटप केले असून भविष्यात रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करनार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी कोरोनाला न घाबरता त्याच्याबरोबर जगायला शिकले पाहिजे असे सांगत ‘आपणच आपले रक्षक ‘ याप्रमाणे शासकीय नियमांचे पालन करण्याचा सल्ला देत आवश्यक असेल त्यावेळीच घराबाहेर पड़ा, मास्क वापरा,स्वच्छता राखा असे सांगून पै.आबासाहेब वाघमारे पाटील मित्र मंडळाच्या कामाची स्तुति केली.

प्रमुख पाहुने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे मा. उपाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड़ यांनी होमिओपॅथी शास्त्राचे महत्व सांगत कारोनाला रोखण्याची क्षमता होमिओपॅथिमध्ये असल्याचे सांगत,होमिओपॅथिक गोळ्या खाताना त्याला स्पर्श न करता चघळून खाव्यात तसेच ३ दिवसच सकाळी उपाशीपोटी या गोळ्या खाव्यात असे सांगून गोळ्या खाण्यापूर्वी व नंतर २० मिनिटे काही खाऊ पिऊ नये , तसेच कच्चा कांदा,कच्चा लसुन व उग्र कॉफी गोळ्या चालू असताना घेऊ नये असे सांगितले. सर्व वयोगटातील कोणत्याही आजारी असणाऱ्या व्यक्ति ,गरोदर मातांना सुद्धा या गोळ्या फ़ायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले.

यावेळी कोंडबावीचे मा.देवीदास पाटील (मा.सरपंच),शुभाष शिंदे(मा.सरपंच),दादासो मदने (मा.सरपंच),तुकाराम झूरळे(मा उपसरपंच), दिगंबर माने,नवनाथ माने, नवनाथ घाडगे,भानुदास खरात, भीमराव खरात,काकासो घुले,कुलदीप तरसे, जनार्धन दांगट,हरि यादव,साधु वाघमारे,ग्रामसेविका करंजकर मॅडम, तलाठी सुदर्शन क्षीरसागर,पोलिस मेहेरकर साहेब,पत्रकार कॄष्णा लावंड, पत्रकार संतोष भोसले इ. उपस्थित होते.

यावेळी डॉ अक्षय वायकर ( उपाध्य्ष भा ज पा युवा मोर्चा, माळशिरस तालुका), डॉ. विजय निलटे,डॉ हर्षवर्धन गायकवाड,डॉ प्रमोद गायकवाड, डॉ विशाल बळवंतराव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द्वारकाधीश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष चि. ऋषिकेश गायकवाड, शिवाजी धुमाळ,तेजस वाघमारे,सूरज वाघमारे,राहुल वाघमारे,सतीश यादव, मोहन वाघमारे, सुदर्शन गायकवाड ,विष्णु गायकवाड, ऋतुराज गायकवाड, शिरिषकुमार देशमुख,कुलदीप गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माउली वाघमारे तर आभार तुकाराम झुरळे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here