आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून ‘कार्य हीच ओळख फाऊंडेशन’ चा गौरव

बारामती (बारामती झटका)
पर्यावरण, जलसंधारण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल बारामती येथील ‘कार्य हीच ओळख फाऊंडेशन’ चे आंतरराष्ट्रीय
मानवाधिकार संघटनेकडून सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. दि. ८ जुन २०१८ रोजी ‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ ची स्थापना करून वृक्षारोपण, जलसंधारण, आरोग्य व रक्तदान शिबीर, किल्ले स्पर्धा, वाचनालय, कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य हीच ओळख फाऊंडेशने दखलपात्र कार्य केले आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना जीवनावश्यक साहित्य वाटप असे विविध उपक्रम ही संस्था समर्थपणे राबवत आहे. तसेच वृक्षारोपण व त्यांचे संगोपन अशा उल्लेखनीय कार्याची मंगळवारी (दि. ८) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. विजयकुमार काळे यांच्याहस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर बनकर यांना सन्मानपञ देण्यात आले. यावेळी रविकुमार काळे, सोनाली खाडे, गुनश्री रासकर, अक्षय धुमाळ, संदीप बनकर आदी उपस्थित होते.

‘कार्य हीच ओळख फाउंडेशन’ च्या माध्यमातून आजवर विविध विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी कडक उन्हाळ्यात पक्षांची धान्य-पाण्याची सोय होण्यासाठी ‘मुठभर धान्य, घोटभर पाणी’ ही संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून सुरू केली. संस्थेच्या ‘हरित वृक्ष बन’ या
संकल्पनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे आणि त्याचे संगोपन करण्याचे काम केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here