आदर्श कुटुंबकर्ता, समाजसेवक, जनसामान्य माणसातील नेतृत्व हरपले – राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर.

कर्णवर पाटील परिवार यांचा पर्यावरणाचा समतोल आणि स्मृती जपण्याचा अनोखा उपक्रम.

गोरडवाडी ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आदर्श एकत्रित कुटुंब पद्धतीत आदर्श कुटुंबकर्ता व जनतेची सेवा करणारे समाज सेवक, सर्वसामान्य लोकांमध्ये अडीअडचणीला उपयोगी पडून जनसामान्य माणसांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारे, जनसामान्य माणसातील नेतृत्व हरपले असल्याची खंत चांदापुरी कारखान्याचे माजी चेअरमन, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी स्वर्गीय नानासाहेब कर्णवर पाटील यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रम प्रसंगी शोकसभेच्या वेळी बोलताना सांगितली. यावेळी श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरीराव, ज्येष्ठ नेते गणपतराव वाघमोडे, माजी उपसभापती माणिकराव कर्णवर, पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने, अजय सकट, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, माळशिरसचे युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, रयत क्रांतीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव गोरड, पाटबंधारे अभियंता विजय मारकड, श्री श्री साखर कारखान्याच्या संचालिका उषाताई मारकड, कॅन मॅनेजर सुनील सावंत, भागवत पाटील, ज्येष्ठ विचारवंत दादासाहेब हुलगे, सतीश दडस, मच्छिंद्र गोरड सर, पत्रकार रघुनाथ देवकर, श्रीनिवास कदम पाटील आदींसह पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच, उपसरपंच, विकास सेवा, दूध संस्था, मजूर संस्था, चेअरमन व अनेक गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

कर्णवर पाटील यांच्या परिवाराने पर्यावरणाचा समतोल आणि स्मृती जपण्यासाठी अनोखा उपक्रम राबवलेला आहे. 5 वृक्षांची लागवड शेषागिरीराव, उत्तमराव जानकर, माणिकराव कर्णवर, गणपतराव वाघमोडे, गौतमआबा माने, अजय सकट आदी मान्यवर यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ज्येष्ठ नेते गणपतराव वाघमोडे, लक्ष्मणराव गोरड, राजाभाऊ पवार, कॅन मॅनेजर सुनील सावंत, संपादक श्रीनिवास कदम पाटील सर्व मान्यवरांनी स्वर्गीय नाना यांच्यावर बोलत असताना माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामधील स्वर्गीय नानासाहेब यांनी माळशिरस तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पदावर काम केलेले आहे. त्यांनी माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या अध्यक्षपदही भूषवले होते. गोरडवाडी गावचे ते माजी सरपंच होते. गोरडवाडी पंचक्रोशीमध्ये नानांनी आपल्या कार्यातून वेगळा ठसा उमटविला होता. अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करणे, योग्य मार्गदर्शन करणे एवढेच नव्हे तर, कितीतरी लोकांना त्यांनी अडचणीतून बाहेर काढलेले आहे. पूर्वीपासून त्यांचा स्वभाव बोलका व प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायामध्येसुद्धा अनेक सहकार्यांना मदत केलेली आहे. समाजामध्ये आदराचे स्थान असणारे नाना यांना घरांमध्येही आदर होता. साधी राहणी, उच्च विचारसरणी असे नानांचे राहणीमान होते. घरामध्ये सहा भावंडे, बहिणी, पुतणे, पुतण्या, भाचे, भाची यांच्यामध्येही नानांच्या शब्दाला किंमत होती. नानांचे एक बंधू बऱ्याच वर्षापूर्वी वारलेले होते, त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करून एक मुलगा पोलीस खात्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सोमनाथ कर्णवर पाटील कार्यरत आहेत तर दुसरा पुतण्याला इंजिनीयर केलेले आहेत. पुतणीला डॉक्टर केलेले आहे. नानांचे शिक्षण जेमतेम झालेले होते मात्र, नानांना व्यवहारिक ज्ञान भरपूर होते. त्यांनी घरातील दुसरी व तिसरी पिढी सुसंस्कृत केलेली आहे. नानासाहेब यांचा गोरडवाडी गावच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. असे मत मान्यवरांनी नानांच्या जीवन प्रवासावर शोकसभेत बोलताना व्यक्त केले.

कोरोना परिस्थिती असल्यामुळे सॅनिटायझर फवारणी आलेल्या सर्व लोकांवर करून सामाजिक आंतर पाळण्यासाठी लोकांना जागेवरच अस्ती कलश फिरविण्यात आला. शोकसभेच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार रघुनाथ देवकर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here