कर्जत जामखेड चे आमदार रोहितदादा पवार यांचा शिक्षक पती-पत्नी यांना दिलासा.


मुंबई (बारामती झटका)


महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेऊन कर्जत जामखेड चे कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार यांनी सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन दिलं आणि बदल्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये शिक्षक पती-पत्नीला पूर्वीप्रमाणे प्राधान्य देण्याबाबत धोरण ठरविण्याची मागणी केली. नामदार हसन मुश्रीफ महोदय यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. असल्याचे मत कर्जत जामखेड चे कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.आमदार हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक पती-पत्नी हे गेल्या १०-१५ वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात. त्यामुळं त्यांना अनेक वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. एकतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते, दुसरीकडे त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्यावरही विपरित परिणाम होत असल्याने काही जणांचे घटस्फोटही होत आहेत. हे टाळण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीला एकत्रित राहता यावे यासाठी त्यांची प्राधान्याने बदली करण्याचा निर्णय सप्टेंबर २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. परंतु नंतर मागील भाजप सरकारने एप्रिल २०१७ मध्ये बदल्यांच्या प्राधान्यक्रमात पुन्हा बदल केला. यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीची एका जिल्ह्यात बदली करण्यात अडथळा निर्माण झाला. याचा एकूणच शिक्षकांच्या कुटुंबावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. असे आमदार रोहित दादा पवार यांनी दिलेल्या निवेदनामध्ये शिक्षकांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यामुळे पती-पत्नी शिक्षक यांची होणारी परवड हेळसांड थांबणार असल्याने महाराष्ट्रातील शिक्षकांच्या मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्युब चॅनेलला सर्च करा. सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://www.facebook.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-1108279732699520/?ti=as संपादक – श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल नंबर 98 50 10 49 14 व्हाट्सअप नंबर 97 66 70 35 14, 9130103214, कार्यकारी संपादक – आदेश श्रीनिवास कदम पाटील. मोबाईल 7219325314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here