जिल्हा परिषद सदस्या सौ. ज्योतीताई पाटील यांनी कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला.

मतदार संघात जनतेच्या मनावर कार्यातून आपलेपणा निर्माण केला.

माळशिरस ( बारामती झटका )

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या ज्योतीताई पाटील यांनी अनेक प्रलंबित प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील सातत्य आणि सकारात्मकता यामुळे आपल्या मतदार संघात रस्ते व पाणी योजनांसाठी मोठा निधी मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळे त्यांच्या या चांगल्या कार्याचे माळशिरस तालुक्यामध्ये कौतुक पहावयास मिळत आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून मतदार संघातील जनतेच्या मनावर आपलेपणा निर्माण केलेला वाढदिवसानिमित्त त्यांना जनतेतून आलेल्या शुभेच्छां वरून दिसून येत आहे.माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य के. के. पाटील यांनी तीन वेळा पंचायत समितीमध्ये कार्यभार केल्यामुळे त्यांच्या नावाचा वेगळाच ठसा सोलापूर जिल्ह्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. मतदार संघाची विभागणी होवून महिलांसाठी जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्याने के. के. पाटील ऐवजी त्यांच्या पत्नीकडे या मतदार संघाची जबाबदारी आल्याने विनोदाने लोक पतीची जागा पत्नीने घेतली असे म्हणत होते. सौ.ज्योतीताई पाटील ह्या उच्च शिक्षण, उत्तम वक्तृत्व, राजकीय वारसा आणि समस्यांच्या प्रश्‍नांच्या मुळाशी भिडण्याची त्यांच्याकडे असणारी काम करण्याची पध्दत त्याच वृत्तीमध्ये त्यांनी अल्पावधीमध्येच आपला प्रभाव सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये निर्माण करुन अनेक प्रलंबीत प्रश्‍नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे. त्यांनी तत्कालीन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सार्वजनिक बांधकाममंत्री, चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून विविध योजनांसाठी मोठा निधी मिळविला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत विद्यमान अध्यक्षांच्या बाजूने त्या ठाम उभा राहिल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेमधूनही आपल्या गटाला झुकते माप मिळवण्यात त्या यशस्वी झालेल्या आहेत. के. के. पाटील यांची राजकीय कारकिर्द अतिशय दैदिप्यमान व प्रभावी अशा पध्दतीने असल्यामुळे के.के. पाटील यांचा राजकारणामध्ये मोठा नावलौकीक आहे. त्यांनी अनेक प्रश्‍नांना वाचा फोडण्याकरिता जिल्हा परिषद, मंत्रालय या ठिकाणी वेळोवेळी जावून आपले प्रश्‍न सोडवून घेतलेले आहेत. त्यांचे मंत्रालयामध्ये अनेक वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांशी सलोख्याचे संबंध आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांचा मदतीचा व आधाराचा हात त्यांच्यासाठी खुप महत्वाचा दुवा ठरलेला होता त्यांचे आणि भारतीय साहेबांचे अतिशय जवळचे व घरगुती संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी पाटलांच्या प्रश्‍नांकडे विशेष लक्ष देवून अनेक प्रश्‍न सोडविलेले आहेत. जलयुक्त शिवार मधून निमगांवसाठी तीन व जिल्हा परिषद शेष फंडातून एक सिमेंट बंधारा. जलयुक्तमधून नऊ पाझर तलाव व तीन कोल्हापूर पध्दतीच्या तलावांची दुरुस्ती, झिंजेवस्ती व कुसमोड येथे सिमेंट बंधारे दुरुस्ती व खोलीकरण, कुसमोड ते लिंगेरेवस्ती, कुसमोड बोरकरवस्ती ते निमगांव रस्त्यांची कामे, झिंजेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाला मंजुरी, जनसुविधा योजनेतून गावोगावच्या स्मशानभुमीच्या दुरुस्त्या, संरक्षक भिंत व रस्ते, निमगांवच्या खंडोबा मंदिराजवळ जलकुंभ, पठाणवस्तीच्या शाळकरी मुलांच्या सोयीसाठी बांधलेला पूल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून येणार्‍या वस्तूंचे गरजूंना वाटप आणि सार्वजनिक व वैयक्तिक अडचणी सोडविण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यामुहे अल्पावधीतच त्यांचे नाव राजकीय पटलावर सतत चर्चेत आहे. खास विशेष प्रयत्न करुन त्यांनी निमगांव-मळोली या रस्त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये निधी मिळविलेला होता. विशेष म्हणजे निमगांव-मळोली हा रस्ता त्यांचे पतीरात के.के. पाटील यांनी कंन्स्ट्रक्शनला सुरुवात केली. त्यावेळेला 1992 ते 1993 या साली त्यांनी या रस्त्याचे खडीकरण केले होते. नंतर त्या रस्त्यावर डांबरीकरण झालेले होते. सध्या त्या रस्त्याची एवढी भयाण दयनीय अवस्था झालेली होती. अनेक स्तरातून आवाज, नाराजी, प्रयत्न होवूनसुध्दा ह्या रस्त्यांकडे कोणीही गांभीर्याने पाहिलेले नव्हते तेच काम के.के. पाटील व ज्योतीताई पाटील यांनी या रस्त्यावर ये-जा करणार्‍या लोकांशी कायमस्वरुपी अडचण दूर केलेली आहे. अशाच प्रकारे पालखी मार्ग, निमगांव, पिलीव, बचेरी या रस्त्यांसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपायांचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी मिळविलेला आहे. थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या शिफारशीवरुन असा निधी मिळविणार्‍या त्या जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद सदस्या आहेत. या परिसरामध्ये ज्यांनी ज्यांनी मतदान करुन सेवा करण्याची संधी दिली त्या लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी खरचं आपल्या मताचं सोनं झालं असंही मतदारांच्यामध्ये त्यांच्याविषयी कुतुहूल, आपुलकी व जिव्हाळा वाढत असल्याचे जाणवत आहे. सौ ज्योतीताई पाटील यांचा आज 18 मार्च 2021 रोजीचा वाढदिवस संपूर्ण मतदारसंघातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कारण त्यांनी आपल्या चार वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवून लोकांना दिलासा दिलेला आहे सार्वजनिक व व्यक्तिगत कामे करून सर्वसामान्य माणसांची मने जिंकलेली आहेत अशा सर्वगुणसंपन्न असणाऱ्या सौ. ज्योतीताई पाटील यांना उदंड आयुष्य आरोग्य धनसंपदा लाभो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस साकडे बारामती झटका परिवार यांचेकडून वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here