दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरण कार्यक्रमाचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते शुभारंभ

पुणे (बारामती झटका) 

पुढारी रिलीफ फाऊंडेशन आणि पुणे महानगर पालिका यांच्यामार्फत दिव्यांगांच्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे करण्यात आला.

             यावेळी आमदार सुनील टिंगरे, दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश जाधव, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, नगरसेविका सायली वांजळे, नगरसेवक सचिन दोडके, गणेश ढोरे,  दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी, दिव्यांग हक्क सुरक्षा समिती अध्यक्ष हरिदास शिंदे , दिव्यांग नागरिक उपस्थित होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाचा चांगला उपक्रम महानगरपालिका आणि पुढारी रिलीफ फाऊंडेशन ने आयोजित केला आहे. पुढारी समूह नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होत आहे. राज्यात सर्वाचे लसीकरण करण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले.

स्व.आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण

 स्व.आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे  लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे  येथे करण्यात आले. यावेळी हर्षदाताई वांजळे, नगरसेविका सायली वांजळे, नगरसेवक गणेश ढोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here