धानोरे, दारफळ, विठ्ठलवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धन व सृष्टीसौंदर्यात भर पडण्यासाठी राबविला स्तुत्य उपक्रम

माढा (बारामती झटका)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुक्यातील धानोरे देवी, दारफळ सीना व विठ्ठलवाडी येथे 10 जून रोजी पर्यावरण संवर्धन व गावच्या सृष्टीसौंदर्यात भर पडावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले.

धानोरे देवी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढा तालुका नूतन उपाध्यक्ष तानाजी देशमुख व कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अभिलाष देशमुख, मंगेश देशमुख, सज्जन देशमुख, शुभम देशमुख, योगेश ताटे, बंडू शिंदे, कपिल क्षीरसागर, प्रदीप क्षीरसागर, सुरज देशमुख, संतोष ताटे यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख म्हणाले कि, सध्या पावसाळा ऋतु सुरू असून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक कार्यक्रम राबविला आहे. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायत व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि जास्तीत जास्त नवीन वृक्ष लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.

दारफळ सीना येथे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक शिंदे सर व उपसरपंच शिवाजी बारबोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच औदुंबर उबाळे, लक्ष्मण देवकुळे, प्रविण तोडगा, राजेंद्र कांबळे, सचिन शिंदे, बबन घोडके यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

विठ्ठलवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका नूतन उपाध्यक्ष रामचंद्र भांगे व सरपंच संगीता अनभुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नारायण खांडेकर, अशोक गव्हाणे, नेताजी कदम, ग्रामसेविका अनिसा पठाण, हनुमंत पाटील, भारत कदम, विजय गव्हाणे, पंडित नागटिळक, रमेश बरकडे, दत्तात्रय काशीद, दीपक जगताप, महेश भांगे, अविनाश माने, धनाजी शेंडगे, भागवत मोटे, रोहित भांगे, निरंजन खांडेकर, प्रकाश खैरे, अक्षय कदम, शुभम खैरे, लहू शिंगाडे, विक्रांत कदम, महेश गव्हाणे, अमित वायकर, सोमनाथ बरबडे, आदिनाथ शेगर यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here