पायरीपुल येथे रक्तदान शिबिर, 129 रक्तदात्यांनी केले रक्तदान

शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून शिबीर संपन्न

श्रीपुर (बारामती झटका)

महाळुंग (ता. माळशिरस) येथील सत्यमेव जयते प्रतिष्ठाण पायरीपुल, तांबवे, यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पायरीपुल, तांबवे, परिसरातील 129 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी शासनाने घालून दिलेल्या नियमाचे सर्वांनी पालन केले होते. रक्तदान करण्यासाठी आलेल्या सर्व रक्तदात्यांनी मास्क, सॅनिटायझर, त्याचबरोबर सोशल डिस्टंन्स पाळून रक्तदान केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता माजी सैनिक मेजर गणपत शंकर जाधव यांच्याहस्ते फित कापून रक्तदान शिबीरास सुरवात करण्यात आली. यावेळी नागरीक, युवकानी चांगला प्रतिसाद दिला.

महाळुंग (ता. माळशिरस) पायरीपुल येथे रक्तदान शिबीरात रक्तदान करताना रक्तदाते

सध्या देशासह राज्यात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेसह सर्वाना आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत पायरीपुल, ताबवे, येथील सत्यमेव जयते प्रतिष्ठाण यांनी कोरोनागस्तांना एक मदतीचा हात पुढे करून रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. त्यास युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
हा कार्यक्रम पार पडण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत शिंदे, उपध्याक्ष तात्यासाहेब पवळ, सचिव नवनाथ लोहार, खजीनदार अजीत ढावरे, संघटक कुमार जाधव, ज्ञानेश्वर कारंडे, सागर कांबळे, सुर्यकांत गायकवाड, विलास लाटे, आशिष चव्हाण, संदिप जाधव, प्रथमेश बंडलकर, गणेश गुजले, अमर लांडगे, राम माळी, रोहित चव्हाण, यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here