माझी वसुंधरा अभियानात बारामती नगरपरिषद जिल्ह्यात प्रथम आणि विभागात तिसरी

बारामती (बारामती झटका)

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या महत्वकांक्षी माझी वसुंधरा अभियाना स्पर्धेचा निकाल पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते व्हीसीव्दारे ऑनलाईन जाहिर करण्यात आला. यावेळी सन 2020-21 या वर्षात माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा आणि अमृत शहरांचा तसेच सर्वोत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी , जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. नगरपरिषद गटामध्ये एकूण 235 नगरपरिषदा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये बारामती नगरपरिषदेने 761 गुणांसह राज्यात 12 वा, पुणे विभागात 3 रा तर पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबाबतची माहिती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव आणि  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी दिली.

शासनाने गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियानात बारामती नगरपरिषद सहभागी झालेली होती. त्यानुसार निर्सगाशी आपली असणारी कटिबध्दता निश्चित करण्यासाठी पृथ्वी, वायु, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वानुसार स्वच्छता व पर्यावरणसंवर्धन विषयक उपक्रम राबविण्यात आले. या अभियानात बारामती नगरपरिषदेने शहरातील नागरिकांना सहभागी करून हरितशपथ घेणे, स्वच्छता मोहिम राबविणे आदी कार्यक्रम राबविले. प्रदुषणमुक्त पर्यावरणासाठी व अभियानाच्या जनजागृतीकरीता अध्यक्षा एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया मा. सुनेत्रावहिनी पवार, बारामती सायकल क्लब आणि बारामती शहरातील पर्यावरण संवर्धनकामी झटणाऱ्या इतर मान्यवरांच्या सहकार्याने बारामती शहरातून वेळोवेळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याचसोबत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याबाबत जनजागृती व्हावी म्हणून विविध स्पर्धाचे आयोजन केले गेले.त्यामध्ये चित्रकला, निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धा, माझे वैभव माझी बाग स्पर्धा, पर्यावरण संवर्धन विषयक विडीओ मेकिंग आदी स्पर्धांचे आयोजन केले होते, त्यासही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यासोबतच अनेकांत व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या सहकार्याने अभियानाचा प्रसार करण्याकरीता तसेच जास्तीत जास्त नागरिकांना हरित शपथ घेण्याच्या हेतूने सिटीजन व्हॉईस सर्वे घेण्यात आला.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी घेतलेल्या विशेष मेहनतीकरीता त्यांचे अभिनंदन केले. त्यासोबतच सर्व नगरसेवकांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पुढील वर्षी यापेक्षा जास्त गुण मिळवून बारामतीचा नावलौकीक राज्यभर कसा वाढवता येईल याकरीता संबंधितांना सूचना केल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here