विरोधकानी राज्यमंञी भरणे यांच्यावर टीका करताना तारतम्य बाळगावे – हामा पाटील

इंदापूर तालुक्याला ५ टिएमसी पाणी मिळताच विरोधकांच्या पोटात लागले दुखु, हामा पाटील यांची विरोधकावर सडकुन टीका

इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासारख्या कार्यक्षम मंञ्याला काही समाजकंटक उजनी धरणातील पाणी प्रश्नावरून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रथम त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रतिक्रिया इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडिया अध्यक्ष हामा पाटील यांनी दिली. उजनी धरणातील पाणी प्रश्नावरून सोलापूर व पुणे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील विविध संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी उचलत असताना अनेक तज्ज्ञांची मते विचारात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरच्या वाट्याचे पाणी उचलले जात असल्याचा आरोप धादांत खोटा तसेच राजकीय द्वेशापोटी केला जात आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह जलसंपदा खात्याच्या अधिकार्‍यांशी, तज्ञांशी विचारविनिमय करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्याचा त्याग खूप मोठा असून यामध्ये ७० टक्के वाटा हा इंदापूर तालुक्यातील जनतेचा आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सोडून दिल्या आहेत. एवढं सगळं असताना इंदापूर तालुक्यातील तब्बल बावीस गावात पाणी नसल्याने तेथील शेती जिराईत आहे. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. परंतु कार्यसम्राट आमदार दत्ताञय भरणे यांनी निवडणूकी दरम्यान इंदापूर तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द पुर्ण केला. त्यामुळे इंदापूर तालुक्यात पाच टीएमसी पाणी उचलल्यामुळे विविध संघटनांनी नाराजी दाखवून कोणाला तरी खुश करण्यासाठी राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे. त्याचा आम्ही इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध करतो. इथुन पुढे जर राज्यमंत्री भरणे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. अशी प्रतिक्रिया इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडिया अध्यक्ष हामा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here