शेतकर्‍यांना विविध योजनांची माहीती देउन, योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी सहकार्य केले जाईल – कृषीसहाय्यक अंकीता सावंत

वेळापुर (बारामती झटका)
शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन पिलीव मंडलामधून वेळापूर शहरासाठी कृषी विभागाच्या वतीने नियुक्त झालेल्या कृषी सहाय्यक अंकिता सावंत यांनी व्यक्त केले. वेळापूर येथे अंकिता सावंत या कृषी सहाय्यक म्हणून रुजू झाल्याबद्दल त्यांचा वेळापूर विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अंकिता सावंत यांचा वेळापूर सोसायटीच्या माजी संचालिका रतनताई गोरे यांच्या हस्ते शालू घालून श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वेळापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, व्हाईस चेअरमन व सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष महादेवभाऊ ताटे, संग्रामनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीराज माने,ज्ञउमेश भाकरे,भैय्या खोरे इनामदार, रंगादादा माने, मारुती गायकवाड, सोसायटीचे कर्मचारी दत्ता म्हेत्रे, शिवाजी आडत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अंकिता सावंत म्हणाल्या की, वेळापूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी खात्यामार्फत वेळोवेळी पिकवार माहीती दिली जाईल, शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून कृषी खात्यामार्फत मार्गदर्शन केले जाईल. शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांना प्रतिसाद देऊन कृषी योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी कृषी खात्यामार्फत सुरू असलेल्या योजनांसाठी लागणार्या कागदपत्रांची वेळेत पूर्तता करावी. या योजना शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी खात्यामार्फत सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही अंकिता सावंत यांनी यावेळी दिली. तसेच यावेळी वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख म्हणाले की, वेळापूर परिसरातील सर्व शेतकरी वर्गांचे व्हाट्सअप ग्रुप बनवून कृषी खात्याच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे सांगितले. तसेच सोसायटीचे व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे म्हणाले की, शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा यासाठी शेतकरी वर्गामध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे शेवटी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here