श्रीपूर पंधरा सेक्शन परिसरात शेती महामंडळ जमीन नांगरताना मानवी सांगाडे निघाले

श्रीपूर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा अंतर्गत जमीन कसायला दिलेल्या शेतकरी जमीन सुपीक व लेव्हल करत असताना पंधरा सेक्शन हद्दीत जमीन नांगरट करतं असलेल्या जमीनीत मानवी सांगाडे सापडले आहेत. सदर सांगाडे कवठी हाडे ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडले आहेत. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वी या भागात रहाणारे लोक मयत व्यक्तींना शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा अंतर्गत पडिक जागेत दफन करत असावेत, शेती महामंडळातील कामावर असणारे स्थानिक कामगार या परिसरात रहायला होते. त्याकाळी पक्की स्मशानभूमी नसल्याने व सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गोरगरीब अशिक्षित मजूर मयत व्यक्तींना पुरत असत, त्यातीलच हे सांगाडे असावेत.

माढा तालुक्यातील सापटणे येथील ढवळे पाटील यांनी शेती महामंडळ यांचेकडून सुमारे अडीचशे एकर जमीन संयुक्तीक करारांवर एकरी पंचवीस हजार रुपये पुणे येथील हेड ऑफिसमध्ये पैसे भरुन जमीन कसायला सुरुवात करण्यासाठी सदर जमीन नांगरत आहेत. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी श्रीपूर येथील कार्यकर्ते यांनी समक्ष भेट दिली व पहाणी केली. मानवी सांगाडे आहे त्या जमिनीत व्यवस्थीत दफन करा, यातील दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी आरक्षीत ठेवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली असता, शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा येथील कर्मचारी भालचंद्र शिंदे, सुरक्षा रक्षक विलास महाडीक यांनी तुमचे म्हणणे पुणे येथे हेड ऑफिसला कळवा, आम्हाला येथे काही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हेड ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील, असे त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे शैलेश शेंडगे, संदीप घाडगे, बंटी चंदनशिवे व इतर कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. या परिसरात राहणारे व पूर्वी शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळ्यात काम करणाऱ्या येथील रहिवाशांना राहण्यासाठी आठ एकर जमीनही द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी केली आहे. पुणे हेड ऑफिस येथून पुढील निर्णय येईपर्यंत या आठ एकर क्षेत्रावर ढवळे पाटील यांनी ताबा घेऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी श्रीपूर पोलिस चौकीचे पोलिस कर्मचारी धनाजी झगडे आणि गायकवाड बंदोबस्तास उपस्थित होते. मानवी सांगाडे सापडले याची चर्चा परिसरात झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही वाद, संघर्ष न होता पोलिस व कार्यकर्ते आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरण व्यवस्थीत हाताळले. पुढील हेड ऑफिसमधून काय निर्णय व आदेश येतोय याकडे स्थानिक रहिवासी यांचे लक्ष लागलं आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here