हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते निरा भिमा कारखान्यावरती गणेशाची आरती

इंदापूर (बारामती झटका शिवाजी पवार यांजकडून)

शहाजीनगर (ता.इंदापूर) येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक मा. हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची रविवारी ( दि.२३ ) रोजी सायंकाळी आरती करण्यात आली.याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी श्रीगणेशाची विधिवत पूजा केली. श्री गणेशाच्या कृपेने चालु वर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळालेला असला तरी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा वाढत चालल्याने या संकटातून जनतेची लवकर सुटका होऊ दे,असे साकडे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी विघ्नहर्त्या श्री गणरायाला घातले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार उपस्थित होते. नीरा भीमा कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या गणेश मंदिराच्या सभामंडपामध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here