मराठी हृदयसम्राट मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्यावतीने ५०१ गोल्डन दुरांडा झाडांच्या रोपे माळशिरस नगर पंचायतीला भेट

माळशिरस तालुका व सुरेश भाऊ टेळे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगर पंचायत स्थापन झाल्यापासून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांना जे जमले नाही ते. अवघ्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये माळशिरस नगरपंचायत प्रशासकांनी करून दाखविले. सुसज्ज असा बगीचा मैदान वार्ड क्रमांक 11 मध्ये उभे केले आहे.

त्या बगीच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सुरेश भाऊ मित्र मंडळ यांच्यावतीने मा. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५०१ रोपे माळशिरस नगर पंचायतीला भेट देण्यात आली. त्यावेळी भावी नगरसेविका सौ. रेशमाताई सुरेश टेळे, मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ टेळे, ॲड. दादासाहेब पांढरे, रशीदभाई शेख, माजी सरपंच नितीनकुमार थिटे, मनसे माळशिरस शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, मनसे व्यापारी सेना शहराध्यक्ष दिनेश पोरे, डॉ. दिलीप वाघमोडे, डॉ. अनिल पाटील, डॉ. नितीन सिद, डॉ. दत्तात्रेय वाघमोडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. बाबुराव शिंदे, मेडिकल असोसिएशनचे श्रीकांत पंचवाघ, प्रकाश आंबूडकर, स्‍वप्‍नील गांधी, एम.डी. शिदवाडकर, गणेश काळे, मल्हारी टेळे, तात्या तरडे, कुणाल शिंदे, दिनेश लोंढे, काकासाहेब पाटील, दशरथ चोरमले, दत्तात्रेय टेळे, भैय्या गुरव, सदानंद कुंभार, शरद खरात, अमोल सावंत, नितीन जाधव, मुबारक तांबोळी, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत माळशिरस नगरपंचायतचे कार्यक्षम कर्तव्यदक्ष पाणी पुरवठा अधिकारी सुनील मदने साहेब व त्यांच्या टीमकडे वरील सर्व ५०१ रोपे व त्यास लागणारे खत भेट देण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here